विशेष बातम्या
शिंगणापूर–नागदेववाडी पंपिंगसाठी रु.३.६० कोटी निधी मंजूर...
By nisha patil - 11/10/2025 4:35:23 PM
Share This News:
शिंगणापूर–नागदेववाडी पंपिंगसाठी रु.३.६० कोटी निधी मंजूर...
पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आमदार क्षीरसागरांचा प्रभावी पाठपुरावा..
कोल्हापूरातील शिंगणापूर आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यानंतर एकूण रु.३ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. शिंगणापूरसाठी रु.२ कोटी ३० लाख आणि नागदेववाडीसाठी रु.१ कोटी ३० लाख निधी देण्यात आला आहे.
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी हा निधी मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आमदार क्षीरसागर यांनी यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आभार मानले आहेत.
शिंगणापूर–नागदेववाडी पंपिंगसाठी रु.३.६० कोटी निधी मंजूर...
|