ताज्या बातम्या

विधानसभा लॉबीतील राडा! आव्हाड-पडळकर समर्थकांवर कारवाईचा बडगा

Ruckus in the assembly lobby

By nisha patil - 7/18/2025 4:49:12 PM
Share This News:

विधानसभा लॉबीतील राडा! आव्हाड-पडळकर समर्थकांवर कारवाईचा बडगा

पावसाळी अधिवेशनाच्या गदारोळात गुरुवारी विधानसभेच्या लॉबीमध्ये राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे गोपिचंद पडळकर यांचे समर्थक एकमेकांवर धावून गेले. या गोंधळाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेतली आहे.

अनधिकृत अभ्यागतांना घेऊन येणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार असून आव्हाड आणि पडळकर यांना सभागृहात खेद व्यक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा प्रकाराला आळा बसावा म्हणून लोकसभेप्रमाणे नितीमूल्य समिती गठीत केली जाणार असल्याचेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभा लॉबीतील राडा! आव्हाड-पडळकर समर्थकांवर कारवाईचा बडगा
Total Views: 155