बातम्या

सातबारा जमीन विक्रीचे नियम बदलले; सहहिस्सेदारांसाठी मोठा निर्णय!

Rules for the sale of land


By nisha patil - 10/23/2026 2:25:16 PM
Share This News:



सातबारा जमीन विक्रीचे नियम बदलले; सहहिस्सेदारांसाठी मोठा निर्णय!

 सामायिक सातबारा उताऱ्यावर नाव असलेल्या सहहिस्सेदारांना विश्वासात न घेता जमीन विक्री करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून ही कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार, सामायिक सातबारा उताऱ्यावरील जमिनीतील आपला हिस्सा विक्री करताना संबंधित सहहिस्सेदाराने भूमिअभिलेख विभागाची मोजणीची ‘क’ प्रत दस्तासोबत जोडणे आवश्यक आहे. ही प्रत जोडल्यास इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती किंवा ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही.

मात्र, मोजणीची ‘क’ प्रत उपलब्ध नसल्यास किंवा दस्तासोबत जोडलेली नसल्यास इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती अथवा ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असेल. ही कागदपत्रे नसल्यास संबंधित दस्ताची नोंदणी केली जाणार नाही. या निर्णयामुळे सामायिक जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता वाढण्यासह सहहिस्सेदारांचे हक्क सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जमीन खरेदी-विक्री करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची खातरजमा करणे महत्त्वाचे ठरणार आहे.


सातबारा जमीन विक्रीचे नियम बदलले; सहहिस्सेदारांसाठी मोठा निर्णय!
Total Views: 21