विशेष बातम्या

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘रन फॉर युनिटी’ — कोल्हापुरात राज्य राखीव पोलीस दलाचं आयोजन

Run for Unity


By nisha patil - 10/31/2025 5:17:21 PM
Share This News:



राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘रन फॉर युनिटी’ — कोल्हापुरात राज्य राखीव पोलीस दलाचं आयोजन

आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘रन फॉर युनिटी’ या कार्यक्रमाचे आयोजन राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १६, कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले.

 

हा कार्यक्रम कमांडंट तथा पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. दौड सकाळी ७.०० ते ७.४५ या वेळेत नवीन वाशी नाका ते फुलेवाडी रिंग रोड (२.५ किमी) या मार्गावर आयोजित करण्यात आली होती.

या एकता दौडीत

  • ११ पोलीस अधिकारी,

  • १०७ पोलीस अंमलदार,

  • १०० विद्यार्थी (अल्फान्सो स्कूल व आयकॉन इन्स्टिट्यूट),

  • २० शिक्षक, डॉक्टर आणि पत्रकार,

  • तसेच ६२ ज्येष्ठ नागरिक अशा शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्य राखीव दलाच्या जवानांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थित जनसमुदायामध्ये राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.

यानंतर कमांडंट डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली आणि देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमासाठी सहाय्यक समादेशक महांतेश तल्लूर व संजय कांबळे उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व प्रस्ताविक PSI अशोक गुजर यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी सहकार्य केले.

 


राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘रन फॉर युनिटी’ — कोल्हापुरात राज्य राखीव पोलीस दलाचं आयोजन
Total Views: 33