बातम्या

गॅस संपला? आता फक्त मेसेज पाठवा आणि मिळवा घरपोच सिलिंडर

Run out of gas


By nisha patil - 4/10/2025 11:58:13 AM
Share This News:



घरातील गॅस सिलिंडर संपल्यावर आता एजन्सीत धावपळ, रांगेत उभे राहणे किंवा फोन करण्याची गरज उरलेली नाही. देशातील प्रमुख गॅस कंपन्यांनी बुकिंगची प्रक्रिया अधिक सुलभ केली असून, आता फक्त व्हॉट्सअॅपवर “हाय” असा मेसेज पाठवला की गॅस सिलिंडर सेकंदात घरबसल्या बुक करता येतो.

बुकिंग होताच ग्राहकाला कन्फर्मेशन मेसेज मिळतो आणि बिलाची माहितीही कळविली जाते. डिलिव्हरीच्या वेळी नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेला ओटीपी डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला सांगावा लागतो, त्यानंतरच सिलिंडर दिला जातो. या सोयीमुळे गैरवापर आणि चोरी रोखण्यास मदत होत असून, ग्राहकांची सुरक्षितता तसेच पारदर्शकता वाढली आहे.

गॅस सिलिंडर संपला तरी आता मोबाइलवर काही क्षणांत बुकिंग करून तो सहजपणे घरपोच मिळू शकतो.


गॅस संपला? आता फक्त मेसेज पाठवा आणि मिळवा घरपोच सिलिंडर
Total Views: 79