ताज्या बातम्या

डॉलरपुढे रुपयाची ऐतिहासिक घसरण; ९१.६४चा नवा नीचांक

Rupee hits historic low against dollar new low of 91


By nisha patil - 1/22/2026 11:44:24 AM
Share This News:



मुंबई  :- जागतिक अस्थिरता, भू-राजकीय घडामोडी आणि परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून भांडवल काढून घेतल्याचा थेट फटका रुपयाला बसला आहे. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ६७ पैशांनी घसरून ९१.६४ या आजवरच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.

परकीय चलन बाजारात रुपयाची सुरुवात ९१.०५ वर झाली होती. दिवसभरात तो ९१.७४ पर्यंत घसरला आणि अखेर मोठी घसरण नोंदवत ९१.६४ वर स्थिरावला. तज्ज्ञांच्या मते, ही नोव्हेंबर २०२५ नंतरची एका दिवसातील सर्वांत मोठी घसरण आहे.

घसरणीची प्रमुख कारणे :
आंतरराष्ट्रीय तणाव, अमेरिकेच्या संभाव्य शुल्क धोरणांबाबतची अनिश्चितता, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावरील विक्री आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरता यामुळे रुपयावर दबाव वाढला आहे.

शेअर बाजारातही दबाव कायम :
जागतिक घडामोडी आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदवली गेली. सेन्सेक्स २७०.८४ अंकांनी घसरून ८१,९०९, तर निफ्टी ७५ अंकांनी घसरून २५,१५७ वर बंद झाला.

या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे अंदाजे ३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे बाजार तज्ज्ञांनी सांगितले.

 


डॉलरपुढे रुपयाची ऐतिहासिक घसरण; ९१.६४चा नवा नीचांक
Total Views: 28