बातम्या
२० हजारांहून अधिक चुका झालेल्या मतदार यादीवर ऋतुराज पाटील यांची आयुक्तांकडे कडक निवेदन
By nisha patil - 11/24/2025 4:11:38 PM
Share This News:
२० हजारांहून अधिक चुका झालेल्या मतदार यादीवर ऋतुराज पाटील यांची आयुक्तांकडे कडक निवेदन
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक २०२५ साठीची प्रारूप मतदार यादी गंभीर त्रुटींनी भरलेली असल्याचा आरोप करीत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आयुक्तांना निवेदन दिले.
एका प्रभागातील हजारो नावे दुसऱ्या प्रभागात, ३२ हजारांहून अधिक दुबार नावे, अपूर्ण पत्ते, आणि वेबसाईटवर अ-वाचनीय यादी यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी म्हटले.
पाटील यांनी चुका प्रशासनाने स्वतःहून दुरुस्त कराव्यात, एकत्रित हरकती स्वीकाराव्यात, हरकतींची मुदत वाढवावी आणि छायाचित्रासह शोधण्यायोग्य यादी तातडीने उपलब्ध करावी, अशी मागणी केली
२० हजारांहून अधिक चुका झालेल्या मतदार यादीवर ऋतुराज पाटील यांची आयुक्तांकडे कडक निवेदन
|