विशेष बातम्या
एस.जे. फाउंडेशन तर्फे वारांगनांसोबत आगळीवेगळी भाऊबीज
By nisha patil - 10/27/2025 11:23:40 AM
Share This News:
एस.जे. फाउंडेशन तर्फे वारांगनांसोबत आगळीवेगळी भाऊबीज
कोल्हापूर : लाईन बाजार, कसबा बावडा येथील एस.जे. फाउंडेशन तर्फे यावर्षीची भाऊबीज समाजातील दुर्लक्षित वारांगनांसोबत साजरी करण्यात आली. पद्मा पथक हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात वारांगनांना एक महिन्याचे राशन व साडी देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुण्या गीता हसुरकर (अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर) यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करत आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. वारंगना संघटनेच्या अध्यक्षा शारदा यादव यांनी हा सन्मान आमच्यासाठी अभिमानाचा असल्याचे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी समाजातील दुर्लक्षित घटकांना मदत करण्यासाठी हा उपक्रम राबविला असल्याचे सांगितले. कार्यक्रमास अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
एस.जे. फाउंडेशन तर्फे वारांगनांसोबत आगळीवेगळी भाऊबीज
|