विशेष बातम्या

स्मॅक–एस. बी. ग्लोबल कौशल्य विकास करार

SMACK S B Global Skills Development Agreement


By nisha patil - 11/12/2025 6:27:31 PM
Share This News:



स्मॅक–एस. बी. ग्लोबल कौशल्य विकास करार

 औद्योगिक प्रशिक्षणामुळे युवकांना रोजगाराची नवी संधी

शिरोली : शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक) कोल्हापूर आणि एस. बी. ग्लोबल एज्युकेशनल रिसोर्सेस प्रा. लि. यांच्यातील सामंजस्य करार एमआयडीसी शिरोली येथील स्मॅक भवनमध्ये करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये युवकांना प्रशिक्षणाद्वारे देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्याचा उपक्रम सुरू होणार आहे.

स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले यांनी कौशल्य विकासामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळणार असून, हा उपक्रम सामाजिक दायित्वातून युवकांसाठी मोठी संधी निर्माण करणार असल्याचे सांगितले. फेडरल बँकेच्या सीएसआर निधीतून या प्रशिक्षणांचे संपूर्ण शुल्क भरले जाणार असून, सीएनसी ऑपरेटर, प्रोग्रामर, ऑटोकॅड, वेल्डर, मशिनिस्ट, थ्रीडी स्कॅनर यांसारखे प्रात्यक्षिक आधारित अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

या उपक्रमामुळे कोल्हापूर परिसरातील युवकांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणासह देशभरात रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. स्मॅक आयटीआयचे शासनमान्य सर्टिफिकेट मिळाल्याने प्रशिक्षणार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर पात्रता लाभणार आहे. कार्यक्रमात करारावर अधिकृत सह्या करण्यात आल्या. या उपक्रमासाठी स्मॅक आयटीआयचे चेअरमन प्रशांत शेळके यांचे विशेष सहकार्य लाभले.


स्मॅक–एस. बी. ग्लोबल कौशल्य विकास करार
Total Views: 23