विशेष बातम्या
सौंदत्ती यात्रेसाठी एस.टी. सवलत; आमदार राजेश क्षीरसागर यांचा सत्कार
By nisha patil - 11/20/2025 6:05:42 PM
Share This News:
सौंदत्ती यात्रेसाठी एस.टी. सवलत; आमदार राजेश क्षीरसागर यांचा सत्कार
कोल्हापूर — कर्नाटकातील सौंदत्ती डोंगर येथील श्री रेणुका देवी यात्रेसाठी एस.टी. भाडे व खोळंबा आकारात विशेष सवलत देण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतला आहे. भाविकांना दिलासा मिळावा यासाठी सातत्याने विशेष पाठपुरावा केल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना आणि करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटना यांच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष अच्युतराव साळोखे, उपाध्यक्ष सरदार जाधव, कार्याध्यक्ष सुभाष जाधव, सरचिटणीस तानाजी चव्हाण, करवीर निवासिनी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप साळोखे, उपाध्यक्ष किरण मोरे, कार्याध्यक्ष उदय पाटील, सचिव प्रशांत खाडे, तसेच चेतन पवळ, युवराज मुळे, गजानन विभूते, दयानंद घबाडे, आकाश पाटील, केशव माने, संजय मांगलेकर, सुरेश विरंगुळे, दिलीप परीट, विजय पाटील, अनिल देवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सौंदत्ती यात्रेसाठी एस.टी. सवलत; आमदार राजेश क्षीरसागर यांचा सत्कार
|