ताज्या बातम्या
STP प्रकल्पावरून खदखद: नागरिकांचा विरोध, प्रशासनाची एकतर्फी कारवाई
By nisha patil - 1/8/2025 3:59:11 PM
Share This News:
STP प्रकल्पावरून खदखद: नागरिकांचा विरोध, प्रशासनाची एकतर्फी कारवाई
पोलिस बंदोबस्तात कामाला सुरुवात!
प्रशासनाच्या एकतर्फी कारवाईचा जिवंत पुरावा!
आज STP (सिव्हेज ट्रिटमेंट प्लांट) प्रकल्पाच्या प्रस्तावित जागेवर महानगरपालिकेचे अधिकारी आणि संबंधित कंपनीचे कर्मचारी अचानक पोहोचले. यावेळी माजी नगरसेवक महेश वासुदेव,
सामाजिक कार्यकर्ते सुरज सुर्वे, वर्षा नगरचे स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन या प्रकल्पाला जोरदार विरोध केला.
यावेळी महिलांनीही ठाम भूमिका घेतली, आणि परिसरातील नागरिकांनी एकत्र येत लोकशाही मार्गाने आवाज उठवला. पण दुर्दैव असे की, प्रशासनाने नागरिकांचा आवाज ऐकण्याऐवजी थेट पोलिस बंदोबस्त मागवला, स्थानिकांना दबावत जागा रिकामी करवून घेतली आणि बळजबरीने काम सुरू केलं.
या प्रकल्पामुळे परिसरातील जीवनशैली आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होणार आहेत, असा नागरिकांचा आरोप असूनही त्यांच्या मताला दुजोरा देण्याऐवजी त्यांना गृहीत धरलं जात आहे.
यावेळी नागरिकांची एकच मागणी केली या प्रकल्पाची सखोल चौकशी व्हावी, लोकशाहीत जनतेचा आवाज महत्त्वाचा आहे हे प्रशासनाने लक्षात ठेवावं. हा परिसर कुणाच्याही मर्जीचा नव्हे – इथल्या लोकांचा आहे!
STP प्रकल्पावरून खदखद: नागरिकांचा विरोध, प्रशासनाची एकतर्फी कारवाई
|