शैक्षणिक
शहाजी महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाची शिवाजी विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा संपन्न
By nisha patil - 1/10/2025 12:09:21 PM
Share This News:
कोल्हापूर : श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात मंगळवारी शिवाजी विद्यापीठ व श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने बी.ए भाग दोन राज्यशास्त्र ,SEC राज्यशास्त्रातील संकल्पना या विषयावरील सुधारित अभ्यासक्रमावर कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेचे बीजभाषण प्रा. आर. जी. वराडकर यांनी केले. राज्यशास्त्रातील नवीन संकल्पना व पद्धती प्राध्यापकांनी समजून घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. समाजात समता निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यावर काही प्रमाणात बंधन लादणे हे काळाची गरज आहे. राज्यशास्त्र ही ज्ञान शाखा समाज नियमन करणारी विद्या शाखा आहे त्यामुळे समाजामधील असलेले प्रश्न सोडविणारे अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. असेही प्रतिपादन केले. उद्घाटन सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात साधन व्यक्ती म्हणून डॉ. संतोष खडसे सर कर्मवीर भाऊराव पाटील इस्लामपूर व दुसऱ्या सत्रात डॉ. आनंदा कांबळे भोगावती महाविद्यालय कुरुकली तिसऱ्या सत्रात डॉ. हारदारे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे समारोपाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रवींद्र भणगे विभाग प्रमुख राज्यशास्त्र विभाग व अध्यक्ष राज्यशास्त्र अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले कार्यशाळेसाठी सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील 90 प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ. आर.डी मांडणीकर यांनी केले व आभार डॉ व्हि.जे.देठे यांनी मांनले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. के. शानेदिवाण यांचे या कार्यशाळेस प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले.
शहाजी महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाची शिवाजी विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा संपन्न
|