बातम्या
दहा दिवसांपासून बेपत्ता असलेला सचिन मंडलिक मृतावस्थेत; अर्जुनवाडीत खळबळ
By nisha patil - 1/12/2025 5:16:55 PM
Share This News:
दहा दिवसांपासून बेपत्ता असलेला सचिन मंडलिक मृतावस्थेत; अर्जुनवाडीत खळबळ
अर्जुनवाडीतील सचिन सुरेश मंडलिक (वय ४०) हा तब्बल दहा दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याचा मृतदेह गावाच्या हद्दीतील आपटेवाडी येथील शेतात कुजलेल्या अवस्थेत सापडला.
२१ नोव्हेंबरला घरातून न सांगता बाहेर पडलेल्या सचिनचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व गावकऱ्यांनी रात्रंदिवस मोहीम राबवली होती. पोस्टर, बॅनर्स लावून, विहिरी–तलाव परिसर तपासूनही काहीच सुगावा लागत नव्हता.
मृतदेह आढळल्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले व सपोनि आबा गाढवे यांनी पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरू आहे.
वारकरी संप्रदायाशी निगडित आणि गावात सर्वांच्या आवडीचा असलेला सचिन अचानक मृतावस्थेत सापडल्याने अर्जुनवाडीत शोककळा पसरली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून तपास सुरू आहे.
दहा दिवसांपासून बेपत्ता असलेला सचिन मंडलिक मृतावस्थेत; अर्जुनवाडीत खळबळ
|