बातम्या
भाजपाचे जेष्ठ नेते विजय (बाबा) देसाई यांचे दुःखद निधन – कार्यकर्त्यांमध्ये शोककळा
By nisha patil - 4/21/2025 12:14:46 AM
Share This News:
भाजपाचे जेष्ठ नेते विजय (बाबा) देसाई यांचे दुःखद निधन – कार्यकर्त्यांमध्ये शोककळा
कोल्हापूर | भाजपाचे जेष्ठ नेते, कार्यकर्त्यांमध्ये “बाबा” म्हणून ओळखले जाणारे आदरणीय श्री. विजय (बाबा) देसाई यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
१९८०-९० च्या दशकात, जेव्हा कोल्हापूर जिल्हा डाव्या विचारांच्या प्रभावाखाली होता, त्या काळात भाजप सारख्या दुर्लक्षित पक्षाला स्थैर्य देण्याचे काम विजय देसाई यांनी अतिशय निष्ठेने केले. आपल्या घरादारकडे दुर्लक्ष करून, काही मोजक्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांनी पक्षाच्या विचारांची पेरणी केली आणि पक्ष उभा केला.
कामगार, फेरीवाले, असंघटित कामगार यांच्यासाठी संघटनांचं बळ देऊन त्यांनी अनेक आंदोलने केली. रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात तर शेकडो कारसेवक जिल्ह्यातून तयार करून त्यांनी पक्षाच्या भूमिकेला आधार दिला होता.
आज भाजपाला जे वैभव प्राप्त झालं आहे, त्या पायाभरणीत बाबांचं योगदान अमूल्य आहे. त्यांनी ज्या निष्ठेने आणि सचोटीने प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाची धुरा वाहिली, त्याला तोड नाही.
त्यांच्या जाण्याने एक झंझावातच शांत झाला आहे.
बाबांनी कार्यकर्त्यांवर पुत्रवत प्रेम केलं, आणि त्यांच्या जाण्याने अनेकांच्या मनात दुःखाची लाट उसळली आहे.
👉 भाजप परिवारात, तसेच कोल्हापूरच्या जनमानसात बाबांना एक कणखर, परंतु अत्यंत आपुलकीचा नेता म्हणून सदैव लक्षात ठेवले जाईल.
भाजपाचे जेष्ठ नेते विजय (बाबा) देसाई यांचे दुःखद निधन – कार्यकर्त्यांमध्ये शोककळा
|