राजकीय

महागाईमुक्तीसाठी सद्गुरु बाळूमामांना साकडं; सरकारला चांगली बुद्धी देण्याची प्रार्थना

Sadhguru Balumam for freedom from inflation


By nisha patil - 5/24/2026 3:01:49 PM
Share This News:



महागाईमुक्तीसाठी सद्गुरु बाळूमामांना साकडं; सरकारला चांगली बुद्धी देण्याची प्रार्थना


कोल्हापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सद्गुरु बाळूमामांच्या मंदिरात विशेष साकडं घालण्यात आले. वाढती महागाई, डिझेल, पेट्रोल व गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर सरकारला चांगली बुद्धी मिळावी आणि नागरिकांना या संकटातून मुक्तता मिळावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.


"देवा बाळूमामा, महाराष्ट्रातील आणि केंद्रातील सरकारला चांगली बुद्धी दे. महागाईपासून सर्वसामान्य माणसाला मुक्तता दे. डिझेल, पेट्रोल आणि गॅस दरवाढीच्या संकटातून नागरिकांना बाहेर काढ आणि भविष्यकाळात या सरकारला सत्तेवरून खाली घाल," अशा शब्दांत आरती व साकडं घालण्यात आले.


यावेळी संपर्क नेते उदय दळवी, जिल्हाप्रमुख सुनील शेंद्रे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश दादा पाटील, संभाजी पाटील, संभाजी भोकरे, जयसिंग टिकले, हर्षल पाटील, अजित खोत, युवराज पवार, अशोक पाटील, मारुती पुरी बुवा, नवनाथ पाटील, थॉमस डिसोजा, विमल पाटील, वसंत कांबळे, उत्तम शेटके यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महागाईमुक्तीसाठी सद्गुरु बाळूमामांना साकडं; सरकारला चांगली बुद्धी देण्याची प्रार्थना


 


महागाईमुक्तीसाठी सद्गुरु बाळूमामांना साकडं; सरकारला चांगली बुद्धी देण्याची प्रार्थना
Total Views: 13