बातम्या

आजरा साखर कारखान्यामध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन.

Safety Week organized at Ajra Sugar Factory


By nisha patil - 4/3/2026 3:39:23 PM
Share This News:



आजरा साखर कारखान्यामध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन.                               

आजरा(हसन तकीलदार) :- गवसे ता. आजरा येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह.साखर कारखाना येथे राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांच्या हस्ते  मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरक्षितता ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची शपथ देण्यात आली. यावेळी मार्गदर्शनपर भाषणात चेअरमन मुकुंदादादा देसाई म्हणाले की, सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःबरोबर कारखाना व समाज सुरक्षित राहील यासाठी आपण सर्वांनी दक्ष राहून काम करावे. त्यासाठी प्रशासनाची आपल्याला कायम साथ राहील.             

निष्काळजीपणा आणि बेफिकीरपणाने केलेले काम स्वतःबरोबर समाजाला हानिकारक ठरते. आपले जीव लखमोलाचे आहे. जीव सांभाळून काम केले पाहिजे. कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असते. त्यामुळे आपली जबाबदारी ओळखून सुरक्षितपणे काम करा. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.के.सावंत, जनरल मॅनेजर एम.आर.पाटील, कार्यालयीन अधीक्षक अनिल देसाई, एच. आर.मॅनेजर एस. पी.भादवणकर, ऊस पुरवठा अधिकारी अजित उर्फ राजू देसाई, सुरक्षा अधिकारी जगदीश देसाई, हेड टाईम कीपर लहू पाटील यांच्यासह विविध विभागाचे खाते प्रमुख,उपखाते प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेफ्टी ऑफिसर रमेश देसाई यांनी केले.


आजरा साखर कारखान्यामध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन.
Total Views: 280