बातम्या

छत्रपती शंभूराजे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सागर वाघमारे व आकांक्षा कदम ठरले विजेते

Sagar Waghmare and Akanksha Kadam emerged winners


By nisha patil - 4/17/2025 4:27:14 PM
Share This News:



छत्रपती शंभूराजे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सागर वाघमारे व आकांक्षा कदम ठरले विजेते

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न...

(कसबा बावडा) | छत्रपती शंभूराजे फ्रेंडस् सर्कलच्यावतीने, आमदार व माजी गृहमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धा गंगा-भागीरथी हॉल येथे उत्साहात पार पडली.

पुरुष गटात पुण्याच्या सागर वाघमारे याने मुंबईच्या विकास धारिया याचा 25/14, 25/15 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. महिलांमध्ये रत्नागिरीच्या आकांक्षा कदम हिने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुण हिला 25/07, 25/15 अशा सेट्समध्ये पराभूत करत चषकावर नाव कोरले.

तिसऱ्या क्रमांकासाठी पुरुष गटात अभिजित त्रिपणकर (पुणे) याने पंकज पवार (ठाणे) याचा पराभव केला, तर महिलांमध्ये प्राजक्ता नारायण (मुंबई उपनगर) हिने मधुरा देवळेकर (ठाणे) हिला हरवले.

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ छत्रपती शंभूराजे फ्रेंडस् सर्कलच्या मुख्य कार्यालयासमोर पार पडला. यावेळी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, जिल्हा कॅरम असोसिएशनचे विजय जाधव, आंतरराष्ट्रीय पंच अजित सावंत, सुर्यकांत पाटील, योगेश फणसळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि आमदार ऋतुराज पाटील यांनीही स्पर्धेला भेट दिली.

स्पर्धेचे समालोचन मंदार बर्डे यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत केले, तर लाईव्ह प्रदर्शन रविंद्र खाडे यांनी केले. स्पर्धकांसाठी मोफत जेवणाचीही व्यवस्था होती. अध्यक्ष शिवाजीराव एकसिंगे यांच्या नेतृत्वाखाली सुनील पाटील, सुजल माने, युवराज माने आणि सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय सुंदर आयोजन केले.


छत्रपती शंभूराजे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सागर वाघमारे व आकांक्षा कदम ठरले विजेते
Total Views: 159