बातम्या
सलगरे ते पाचवा मैल रस्त्याची कामे पूर्ण करा अन्यथा रास्ता रोको.. आंदोलन अंकुश
By nisha patil - 8/4/2026 9:39:57 PM
Share This News:
*सलगरे ते पाचवा मैल रस्त्याची कामे पूर्ण करा अन्यथा रास्ता रोको.. आंदोलन अंकुश*
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांच्याकडून पाहणी.
शिरोळ तालुक्यातून जाणारा सलगरे ते पाचवा मैल राज्यमार्ग १५३ रस्त्यातील अपूर्ण कामामुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे .त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांना वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन अंकुश संघटने कडून पाठपुरावा करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने आज सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज चे उपकार्यकारी अभियंता श्री. गुळवे तसेच मे.राजपथ कंट्रक्शन कडून बाहुबली गाढवे यांनी रस्त्याच्या अपूर्ण कामाची पाहणी करून चर्चा केली. अर्जुनवाड पासून हेरवाडपर्यंत रस्त्याची पाहणी केली त्यावेळी रस्त्याच्या साईड पट्ट्या गटारीं तसेच अर्जुनवाड मधील रस्त्याचे काम अपूर्ण असल्याचे दिसून आले. अपूर्ण कामाबाबत संघटनेचे कार्यकर्त्यांनी व अर्जुनवाडमधील ग्रांमस्थानी अधिकाऱ्यांना धारेवर धरत अपूर्ण कामाबाबत जाब विचारला. चर्चेदरम्यान चुकीच्या पद्धतीने रस्त्याला जर कोण विरोध करत असेल तर पोलीस बंदोबस्तात रस्ता करा अशी मागणी करण्यात आली.यावेळी अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांमध्ये ज्या त्रुटी असतील त्या दूर करून कामास सुरुवात केली जाईल अस आश्वासन दिल आहे.
पण गेले दीड महिना याबाबत पाठपुरावा करत आहोत त्यामुळे येत्या पंधरा दिवसांमध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात न केल्यास अर्जुनवाडच्या चौकामध्ये रास्ता रोको करण्याचा इशारा यावेळी संघटनेकडून देण्यात आला. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, राहुल गायकवाड ,उद्वव मगदूम अनिल सुतार इ. उपस्थित होते.
सलगरे ते पाचवा मैल रस्त्याची कामे पूर्ण करा अन्यथा रास्ता रोको.. आंदोलन अंकुश
|