बातम्या
साळगाव बंधारा पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करणार :शिरीष देसाई
By nisha patil - 3/15/2026 5:20:33 PM
Share This News:
*साळगाव बंधारा पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करणार :शिरीष देसाई*
पेरणोली येथे जि.प. व पं.स. सदस्यांचा सत्कार*
आजरा (हसन तकीलदार )**:-पेरणोली ता आजरा येथे नूतन जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांचा जाहीर सत्कार करणेत आला. यावेळी सत्कार प्रसंगी बोलताना अनेक वर्षे प्रलंबित असलेला साळगाव बंधाऱ्याच्या पुनर्बांधणीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे सदस्य शिरीष देसाई यांनी म्हटले.. पेरणोली येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नूतन सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. सभापती जयश्री गाडे अध्यक्षस्थानी होत्या. राष्ट्रवादी गटनेते, जि.प. सदस्य व केडीसीसी बँक संचालक सुधीरभाऊ देसाई, उपसभापती यशोदा पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सुधीरभाऊ देसाई म्हणाले, जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा वाचविण्यासाठी सभागृहात आवाज उठविणार आहे. तसेच वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळण्यासाठीही प्रयत्न करणार आहे. युवराज पोवार म्हणाले, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करणार आहे. सामान्य माणसाला सोबत घेऊन
विकासकामांसह विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविणार आहे.
कारखाना संचालक अशोक तर्डेकर म्हणाले, नूतन सदस्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.भागातील जनतेने विश्वासाने निवडून दिले आहे. कामकाजाचा अभ्यास करून प्राधान्याने विकासकामांवर भर देण्याची गरज आहे. वंदन जाधव, विष्णू जाधव यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
केल्याबद्दल विवेक जाधव यांचा
सत्कार करण्यात आला.
पत्रकार कृष्णा सावंत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी सभापती, कारखाना संचालक उदयराज पवार, शेतकरी संघ उपाध्यक्ष दौलती पाटील, संजय गाडे,सर्जेराव देसाई , दिनेश कांबळे (उबाठा ),पांडुरंग दोरुगडे, निवृत्ती फगरे, मयुरेश देसाई, संदीप पाटील, दत्तात्रय पारदे, पांडुरंग गुरव, संजय घाटगे आदीजण उपस्थित होते. ईनास फर्नांडीस यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कालेकर यांनी आभार मानले.
साळगाव बंधारा पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करणार :शिरीष देसाई
|