मनोरंजन
सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; गाडी उडवण्याचा इशारा
By nisha patil - 4/14/2025 3:48:37 PM
Share This News:
सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; गाडी उडवण्याचा इशारा
लॉरेन्स बिश्नोई टोळीचा धसका कायम; सलमान खानच्या जीवाला धोका
बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना उघडकीस आलीय. मुंबईतील वरळी ट्रॅफिक विभागाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिलीय. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय.
धमकीमध्ये सलमान खानच्या गाडीला बॉम्बने उडवण्याचा इशारा देण्यात आलाय. यामुळे सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. यापूर्वीही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीने सलमान खानला धमक्या दिल्या होत्या. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार देखील झालेला आहे. आता सलमान खानला घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, गाडीला कार बॉम्ब लावण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; गाडी उडवण्याचा इशारा
|