साळोखेनगर: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग स्पर्धा संपन्न
साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग स्पर्धा उत्साहात पार पडली. 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत समाजातील समस्यांवर तांत्रिक उपाय मांडले.
उद्घाटन प्रसंगी कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्रा. सुयोग पाटील, विभागप्रमुख प्रा. अमर पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. हिना संघानी व डॉ. रणजीत निकम यांनी केले.