शैक्षणिक
शहाजी महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन
By nisha patil - 1/8/2025 3:52:45 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन
कोल्हापूर: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील मराठी विभाग , सांस्कृतिक विभाग व आईक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने आज अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा जागर करण्यात आला तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनाही अभिवादन करण्यात आले.
महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी, प्राध्यापकांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर व लोकमान्य टिळक यांच्या विचारावर मनोगते व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा दिला.
यामध्ये डॉ. आर.डी.मांडणीकर, समृद्धी गुरव, ऋतिका माने, ज्योती कोरवी, समीक्षा माने, शुभांगी पुजारी मानसी तरटे,आर्यन फाले यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.डी.के.वळवी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पल्लवी कोडक यांनी केले. डॉ. शिवाजी रायजादे यांनी आभार मानले. संयोजन डॉ. रचना माने यांनी केले. यावेळी डॉ. के. एम. देसाई डॉ. प्रशांत पाटील, डॉ. पी. बी. पाटील, प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी ,विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण व श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले. शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या वरील ग्रंथांचे प्रदर्शन संपन्न झाले.
शहाजी महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन
|