बातम्या
ह. भ. प. श्री ज्ञानेश्वर महाराज पोतदार यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ने सन्मानित
By nisha patil - 7/24/2025 12:07:54 PM
Share This News:
ह. भ. प. श्री ज्ञानेश्वर महाराज पोतदार यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ने सन्मानित
सांगली (दि. २३ जुलै २०२५): महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज सांगली येथील श्री कालिका मंदिर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सांगली जिल्हा यांच्या वतीने एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ह. भ. प. श्री ज्ञानेश्वर (महाराज) शिवराम पोतदार, मिरज यांना "समाजरत्न पुरस्कार" प्रदान करून गौरविण्यात आले.
.%5B1%5D.jpg)
श्री ज्ञानेश्वर महाराज पोतदार हे गेल्या पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्र व भारतातील सर्व समाजघटकांसाठी तसेच वारकरी संप्रदायासाठी समर्पित जीवन जगत आहेत. सामाजिक बांधिलकी, त्याग आणि निरपेक्ष कर्तृत्व यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना "समाजरत्न पुरस्कार" देण्यात आला.
.%5B2%5D.jpg)
हा पुरस्कार राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार व प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र राज्य आदरणीय इद्रिसभाई नाईकवडी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ व गौरव प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पद्माकर जगदाळे सर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सांगली आणि कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक उदय रामचंद्र पोतदार, शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली उपस्थित होते. तसेच ॲड. पोतदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्ह्यातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ह. भ. प. श्री ज्ञानेश्वर महाराज पोतदार यांनी या गौरवाबद्दल संयोजक आणि सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे मन:पूर्वक आभार मानले.
ह. भ. प. श्री ज्ञानेश्वर महाराज पोतदार यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ने सन्मानित
|