बातम्या
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ कोटींचा 'सन्मान निधी'!
By Administrator - 6/11/2026 4:52:45 PM
Share This News:
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ कोटींचा 'सन्मान निधी'!
दिवाळीपूर्वी रत्नागिरीतील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक दिलासा मिळाला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण सुरू झाले असून, जिल्ह्यातील तब्बल १ लाख ५५ हजार १४३ शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण ३१ कोटी १८ लाख ८६ हजार रुपये जमा झाले आहेत. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होतात.
तालुकानिहाय आकडेवारी पाहता, चिपळूण तालुक्यात सर्वाधिक २१ हजार ५४० शेतकऱ्यांना ४ कोटी ३० लाख ८० हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे. तर गुहागर, संगमेश्वर आणि खेड तालुक्यांतील शेतकऱ्यांच्याही खात्यावर मोठ्या प्रमाणात निधी जमा झाला आहे. दुसरीकडे, मंडणगड तालुक्यात सर्वात कमी ६ हजार ७४० शेतकरी लाभार्थी ठरले असून, त्यांच्या खात्यावर १ कोटी ३४ लाख ८० हजार रुपये जमा झाले आहेत.
दिवाळीच्या तोंडावर खात्यात दोन हजार रुपये जमा झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ कोटींचा 'सन्मान निधी'!
|