बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये संस्कार स्वच्छता व स्वभाव स्वच्छता
By nisha patil - 2/10/2025 3:02:29 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये संस्कार स्वच्छता व स्वभाव स्वच्छता
कोल्हापूर दि.2 : येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या एन.सी.सी. (मुली) व ज्युनिअर एन.एस.एस. विभागाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या परिसरात एन.सी.सी. छात्रांकडून स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता उपक्रमात 32 एन सी सी छात्र, 28 एन.एस.एस. स्वयंसेवक व इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एन.ओ. मेजर सुनिता भोसले व प्रा.एल.एस.नाकाडी यांनी केले होते.
याप्रसंगी प्रा. ए पी म्हात्रे, प्रा. एस पी वेदांते, प्रा.डॉ.अभिजीत पाटील, रजिस्ट्रार एस.के.धनवडे यांचे सहकार्य लाभले. प्राध्यापक कैलास भोसले, माणिक कांबळे उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये संस्कार स्वच्छता व स्वभाव स्वच्छता
|