ताज्या बातम्या

रंकाळ्याजवळ अल्पवयीन चालकाच्या कारचा अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी

Sandeeps organs donated after death


By nisha patil - 12/26/2025 12:04:48 PM
Share This News:



कोल्हापूर :- कोल्हापूरमधील रंकाळ्याजवळ मंगळवारी मध्यरात्री एका अल्पवयीन चालकाने कार चालवताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे संदीप शिवाजी पोवार (३२, आयरेकर गल्ली, शिवाजी पेठ) यांचा अपघातात मृत्यू झाला आणि त्याचा साथीदार शैलेश शिवकुमार कदम (३०) गंभीर जखमी झाला.

डोके दुखावल्यामुळे उपचारादरम्यान संदीप ब्रेनडेड अवस्थेत होता आणि रात्री त्याला मृत घोषित करण्यात आले. शैलेश याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. स्थानिक नागरिकांनी दोघांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसांनी कारमालक श्रीकांत वसंतराव जाधव (४८) आणि त्यांच्या १७ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. संदीप पोवार यांचे नातेवाईकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे.


रंकाळ्याजवळ अल्पवयीन चालकाच्या कारचा अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी
Total Views: 59