ताज्या बातम्या

संघ शताब्दी महोत्सवानिमित्त कोल्हापुरात ‘संघगंगा के तीन भगीरथ’ नाटकाचे आयोजन

Sanghganga Ke Teen Bhagirath


By nisha patil - 8/8/2025 2:49:00 PM
Share This News:



संघ शताब्दी महोत्सवानिमित्त कोल्हापुरात ‘संघगंगा के तीन भगीरथ’ नाटकाचे आयोजन

 कोल्हापुरकरांचा प्रचंड प्रतिसाद, चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त ‘संघगंगा के तीन भगीरथ’ हे दोन अंकी नाटक कोल्हापुरात सादर करण्यात आले. मराठा भवन ट्रस्ट आणि अध्यक्ष महेश जाधव यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन झाले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

दादांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संघ विचार सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात पेंडसे दांपत्याच्या नाट्य सादरीकरणाचे विशेष कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमात अनेक मान्यवर, कार्यकर्ते, आणि दानशूर व्यक्ती उपस्थित होते व त्यांचा गौरवही करण्यात आला.


संघ शताब्दी महोत्सवानिमित्त कोल्हापुरात ‘संघगंगा के तीन भगीरथ’ नाटकाचे आयोजन
Total Views: 109