विशेष बातम्या
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात चौघांचा मृत्यू
By nisha patil - 11/11/2025 12:29:27 PM
Share This News:
विटा (सांगली): सांगली जिल्ह्यातील विटा शहरात आज सकाळी घडलेल्या एका भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. दुकानातील रेफ्रिजरेटर आणि गॅस सिलेंडरच्या एकाच वेळी झालेल्या स्फोटामुळे एका कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेने विटा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, घरात गॅसगळती होऊन किंवा रेफ्रिजरेटरमधील दोषी गॅसमुळे स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्फोट इतका तीव्र होता की, घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. खाली इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान असून वर दुकानदाराचे कुटुंब राहत होते.
या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे. नागरिकांनी घरगुती उपकरणांच्या सुरक्षित वापराबाबत अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात चौघांचा मृत्यू
|