बातम्या

संजयबाबा घाटगेंनी स्वीकारले भाजपाचे प्राथमिक व सक्रिय सदस्यत्व

Sanjay Baba Ghatge accepts primary and active membership of BJP


By nisha patil - 4/26/2025 2:50:43 PM
Share This News:



संजयबाबा घाटगेंनी स्वीकारले भाजपाचे प्राथमिक व सक्रिय सदस्यत्व

कार्यकर्त्यांसमवेत जिल्हा कार्यालयाला दिली भेट...

गेल्या दहा वर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या सरकारने केलेल्या देशाचा विकास गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी आणलेल्या विविध विकासाच्या योजना आणि देशाच्या उद्धारासाठी केलेले काम यावर प्रभावित होऊन मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून पक्षाची शिस्त आणि संघटनेचा आदेश याचप्रमाणे इथून पुढच्या काळात कार्यरत राहील असे प्रतिपादन माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी केले .
 

  भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात आज संजय बाबा घाडगे व अमरीश सिंह घाडगे यांच्या समर्थकांसह पार्टीच्या कार्यालयात प्रथमच सदिच्छा भेट दिली याप्रसंगी ते बोलत होते .  यावेळी पुढे बोलताना संजय बाबा घाडगे म्हणाले ,पक्ष संघटना पक्षशिस्त आणि पक्षाचे ध्येय धोरण या त्रिसूत्री वर आधारित पार्टीचे अनेक समर्पित कार्यकर्ते काम करताना आपण अनेक वर्ष पाहिलेले आहेत या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यासमर्पित भावनेने काम करण्याच्या प्रवृत्तीनेच आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा विजय सुकर झालं असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.


संजयबाबा घाटगेंनी स्वीकारले भाजपाचे प्राथमिक व सक्रिय सदस्यत्व
Total Views: 107