बातम्या

संजय राऊत अचानक आजारी; फोर्टिस रुग्णालयात दाखल

Sanjay Raut suddenly falls ill


By Administrator - 10/13/2025 4:54:58 PM
Share This News:



संजय राऊत अचानक आजारी; फोर्टिस रुग्णालयात दाखल

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची आज अचानक प्रकृती बिघडली. त्वरित त्यांना मुंलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांची फोर्टिसमध्ये रक्त तपासणी झाली होती, मात्र आज परिस्थिती गंभीर वाटत असल्यामुळे उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल सुस्पष्ट माहिती दिली आहे. राजकीय विश्वात त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंतेची लहर पसरली आहे. चाहत्यांमध्येही चिंता वाढली असून, सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची मागणी केली आहे.


संजय राऊत अचानक आजारी; फोर्टिस रुग्णालयात दाखल
Total Views: 63