बातम्या

संजीवनी तोडकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

Sanjeevani Todkar honored with Punyashlok Ahilyadevi Holkar National Award


By nisha patil - 4/14/2025 3:43:37 PM
Share This News:



 संजीवनी तोडकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

निसर्गोपचारातील कार्याची दखल; सात लाखांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार

तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राच्या संस्थापक संजीवनी तोडकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. तेलंगणाचे राज्यपाल जीष्णू देव वर्मा यांच्या हस्ते, तसेच महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव प्रदान करण्यात आला.
 

संजीवनी तोडकर यांनी निसर्गोपचाराच्या माध्यमातून आजवर सात लाखांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. कोणत्याही प्रकारची चिरफाड किंवा ऑपरेशन न करता कमी खर्चात उपचार उपलब्ध करून, त्यांनी सामान्य जनतेच्या जीवनात आरोग्य आणि आनंदाचे हास्य फुलवले आहे. यावेळी त्रिपुरा राज्य मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मुरहरी केळे, भामला फाउंडेशन मुंबईचे प्रमुख आसिफ भामला, तसेच राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष सागर दापटे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


संजीवनी तोडकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
Total Views: 169