बातम्या
विशेष पोलीस महासंचालक पदकप्राप्त निरीक्षक संजीवकुमार झाडे यांचा सत्कार
By nisha patil - 4/30/2025 5:26:40 PM
Share This News:
विशेष पोलीस महासंचालक पदकप्राप्त निरीक्षक संजीवकुमार झाडे यांचा सत्कार
कोल्हापूर | जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री. संजीवकुमार झाडे यांना विशेष पोलीस महासंचालक पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला.
शिस्त, निःपक्षपाती सेवा आणि लोकहितासाठी सातत्यपूर्ण कार्य या त्यांच्या गुणविशेषांमुळे झाडे सरांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे.
त्यांच्या या गौरवाने कोल्हापूर शहराचा गौरव वाढवला आहे.या यशाबद्दल सकल हिंदू समाज परिवारातर्फे त्यांना हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात
आल्या.
विशेष पोलीस महासंचालक पदकप्राप्त निरीक्षक संजीवकुमार झाडे यांचा सत्कार
|