खेळ
जिल्हास्तरीय व्हाँलीबाँल विभागीय स्पर्धेसाठी संजीवनच्या संघाची निवड.
By nisha patil - 9/20/2025 10:50:42 PM
Share This News:
जिल्हास्तरीय व्हाँलीबाँल विभागीय स्पर्धेसाठी संजीवनच्या संघाची निवड.
पन्हाळा प्रतिनिधी, शहाबाज मुजावर मिणचे ता.हातकणंगले येथे १९ व २० सप्टेंबर रोजी पार पडलेल्या १७ वर्षाखालील मुले जिल्हास्तरीय शालेय व्हाँलीबाँल स्पर्धेत संजीवन पब्लिक स्कुलच्या संघांने अंतिम सामन्यात कागल तालुक्याच्या संघाचा पराभव करत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संजीवनच्या संघाने पहिल्या सामन्यात गडहिंग्लज तालुक्याचा एकतर्फी पराभव करत विजयी सलामी देत दबदबा निर्माण केला.त्यानंतर आदर्श विद्यानिकेत या हातकणंगले तालुक्याचा प्रतिनिधित्व करणाऱ्या विजेते पदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या संघासोबत झालेल्या सामन्यात संजीवनच्या संघाने २५-१९,२५-२१ अशा २-० सेटच्या गुणफराने विजय मिळवत उपांत्य सामन्यात धडक दिली.उपांत्य सामन्यात करवीर तालुक्याचा एकतर्फी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.अंतिम सामन्यात संजीवनची लढत कागल तालुक्याबरोबर झाली या सामन्यात संजीवनच्या संघाने पहिला सेट २५-१६ अशा गुणफरकाने जिंकत सामन्यात आघाडी घेतली.दुसऱ्या सेट मात्र अतिशय अटीतटीचा झाला.मात्र संजीवन ने हा सेट २५-२३ ने जिंकत २-०0 अशा सेटनी सामन्यासह स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
संजीवन कडुन श्लोक कवितके,विक्रम माने यांनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले.या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या संघाला क्रीडाशिक्षक प्रकाश जाधोर,प्रशिक्षक अबिद मोकाशी,कपिल खोत,नुरमहंमद नगारजी,जयंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन तर संजीवन चे चेअरमन पी.आर.भोसले,सहसचिव एन.आर.भोसले,क्रीडा यांचे प्रोत्साहान लाभले.
संजीवनचा संघ करिता श्लोक कवितके, विक्रम माने, ओम मगर, सोहम वाडकर ,आर्यन सासवडे, समर्थ ढोक, ओम साळस्कर, अर्जुन पाटील, कार्तिक कौशल्य ,प्रेम शेळके, संचित पाटील, प्रथमेश कदम. या खेळाडूने सहभाग नोंदवला
जिल्हास्तरीय व्हाँलीबाँल विभागीय स्पर्धेसाठी संजीवनच्या संघाची निवड.
|