बातम्या

संस्कार तेजमचे भव्य यश; सामान्यज्ञान स्पर्धेत तालुक्यात द्वितीय*

Sanskar tejmay


By nisha patil - 4/30/2026 12:59:28 PM
Share This News:



**संस्कार तेजमचे भव्य यश; सामान्यज्ञान स्पर्धेत तालुक्यात द्वितीय*

**आजरा(हसन तकीलदार)*:-रायजर्स ट्रेक फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेत आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्याने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. विद्यालयातील इयत्ता ९ वी (अ) मधील विद्यार्थी संस्कार संजय तेजम याने या स्पर्धेत तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

महाराष्ट्रभर विस्तारलेल्या या फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कौशल्याला वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत संस्कारने आपल्या सामान्यज्ञानाच्या जोरावर तालुक्यातून दुसरे स्थान मिळवले आहे.

या यशाबद्दल बोलताना मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्याच्या या यशाचे विशेष कौतुक करण्यासाठी विद्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर यांनी संस्कारचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार आणि वर्गशिक्षिका सौ. ए. डी. पाटील यांनीही संस्कारच्या मेहनतीचे व यशाचे कौतुक केले.

संस्कारच्या या यशामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील योग्य मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय संस्थांच्या स्पर्धेत आपली मोहोर उमटवू शकतात, हे त्याने सिद्ध केले आहे. या यशाबद्दल पालकांकडून आणि आजरा परिसरातून संस्कारवर अभिनंदनाचा वर्षाव होत


संस्कार तेजमचे भव्य यश; सामान्यज्ञान स्पर्धेत तालुक्यात द्वितीय*
Total Views: 10