शैक्षणिक

संस्कृती रानगे 85 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय

Sanskruti Range stood third in college with 85 percent marks


By nisha patil - 5/5/2026 2:50:32 PM
Share This News:



संस्कृती रानगे 85 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय

 

वर्तमानपत्रे वाटणाऱ्या श्री. राजेंद्र रानगे यांच्या मुलीचे 12 वी बोर्ड परीक्षेतील सुयश अंतरंगीचा संघर्ष माणसाला स्वस्थ न ठेवता अविरतपणे ध्यास अस्वस्थता देऊन अंतरंगीची चेतना एका होकारात्मक दिशेने घेऊन जात असते. या अथक प्रवासामध्ये अडचणी, अडथळे हे निश्चित येतात. मात्र या अडथळ्यांवर मात करण्यासाठी अंतरंगी बनवलेला ध्यास प्रवास कुर्मगतीचा झाला तरी न थांबता अविरत नेण्याची इच्छाशक्ती म्हणजे यश हे संस्कृतीने करून दाखविले आहे.  संस्कृती रानगे मुक्काम पोस्ट शिरोली, हिने अत्यंत गरिबीची आणि हालाखीची स्थिती आपल्या यश प्रवासात आड येऊ दिली नाही. घरच्या गरीब परिस्थितीमुळे वडील वृत्तपत्र टाकून अर्थार्जन करतात. संघर्षातील हीच संधी शोधून संस्कृतीने यश मिळविले आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षेतील 75 टक्के मिळालेले गुण हे एका प्रमाणीत उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी अथक दोन वर्षाचा प्रवास 84.33 % पर्यंत नेऊन संस्कृतीने यश सिद्ध केले आहे . संस्कृतीने फेब्रुवारी 2026 च्या बारावी बोर्ड परीक्षेमध्ये 84.33% गुण मिळवून विवेकानंद कॉलेजमध्ये तिसरी आली आहे. सामान्य कुंटुंबातील मुलीने निर्विवादपणे मिळविलेल्या यशासाठी सर्वत्र कौतुक होत आहे.

 

सदरच्या विद्यार्थिनीच्या यशामध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी. बी. पाटील, आर्टस् कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. सौ शिल्पा भोसले, वर्गशिक्षक, सर्व विषय शिक्षक आणि पालक यांचे बहुमोल असे मार्गदर्शन मिळाल्याने हे यश तिने मिळविले आहे.

 

“ ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार” - शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे

विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (अधिकारप्रदत्त स्वायत संस्था)


संस्कृती रानगे 85 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय
Total Views: 5