बातम्या
शिवाजी विद्यापीठात संत संताजी जगनाडे महाराज जयंती
By nisha patil - 9/12/2025 2:59:40 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठात संत संताजी जगनाडे महाराज जयंती
कोल्हापूर, दि.08 डिसेंबर - शिवाजी विद्यापीठात आज संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्या हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी संत तुकाराम अध्यासनाचे समन्व्यक डॉ.नंदकुमार मोरे, उपकुलसचिव गजानन पळसे, ॲड.श्रीमती अनुष्का कदम, सहा.कुलसचिव सुरेश बंडगर, डॉ.सुखदेव एकल, प्रांजली क्षिरसागर, स्मिता राजमाने, पवन पाटील, रवि लोंढे यांच्यासह प्रशासकीय सेवक उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठात संत संताजी जगनाडे महाराज जयंती
|