ताज्या बातम्या
संताजी घोरपडे स्मारक उपोषण मागे; सुनावणी होईपर्यंत हॉल वापरास मनाई
By nisha patil - 1/13/2026 5:57:47 PM
Share This News:
सरसेनापती संताजी घोरपडे स्मारक, पुतळा व बहुउद्देशीय सभागृह ग्रामपंचायतीकडेच राहावे या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण आज पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते उपोषणकर्ते धनाजी सेनापतीकर यांना सरबत देऊन उपोषण समाप्त करण्यात आले.
उपोषणकर्त्यांची तब्येत खालावल्याने डॉक्टर व आरोग्य पथक तैनात होते. यावेळी ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी भेट देत उपोषणकर्त्याचा जीव महत्त्वाचा असल्याचे सांगून प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी खासदार संजय मंडलिक यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा प्रशासनाची हालचाल वेगवान झाली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सी. ए. पाटील यांनी उपोषणकर्त्यांना लेखी पत्र दिले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी अंतिम निर्णय होईपर्यंत बहुउद्देशीय हॉल केवळ देखभालीशिवाय वापरू नये, असा आदेश वाचनालयाला दिल्याचे स्पष्ट केले. पुढील सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार आहे.
यावेळी दत्तात्रय वालावलकर, प्रदीप चव्हाण, महेश देशपांडे, परशुराम तावरे, मंगेश कोळी, तुकाराम भारमल, बाबुराव गुरव, अतुल दिवटणकर, मोहन मोरे आदी उपस्थित होते.
संताजी घोरपडे स्मारक उपोषण मागे; सुनावणी होईपर्यंत हॉल वापरास मनाई
|