बातम्या
बार्शीचे संतोष ठोंबरे यांना राष्ट्रीय महागौरव पुरस्कार गोव्यात प्रदान
By nisha patil - 8/5/2026 5:14:15 PM
Share This News:
बार्शीचे संतोष ठोंबरे यांना राष्ट्रीय महागौरव पुरस्कार गोव्यात प्रदान
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील केटी ट्रॅक्टर्स उद्योग समुहाचे प्रमुख उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते संतोष ठोंबरे यांना कृषी, उद्योग व सामाजिक कार्याबद्दल "महागौरव पुरस्कार २०२६" गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा कला अकादमीच्या शानदार सभागृहात प्रदान करण्यात आला.
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या येथे पार पडलेला तिसऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असणाऱ्या विविध क्षेत्रातील १२ विभूतींचा "महागौरव २०२६" हा राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. त्यात संतोष ठोंबरे यांचा ट्रॅक्टर उद्योग-व्यापार क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी, कृषी व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष व गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळ देसाई, महाराष्ट्र राज्याच्या आयुष्मान भारत योजनेचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, महाराष्ट्र भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष रामकृष्ण वेताळ, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने हे उपस्थित होते. समाजसेवा चळवळीतील एक "नवा पॅटर्न" म्हणून नावारूपास आलेल्या बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठान तसेच भगवंत नेत्रालयाचे संतोष ठोंबरे अध्यक्ष आहेत.ते त्यांच्या परिचितांमध्ये संतोष काका म्हणून ओळखले जातात.
बार्शीचे संतोष ठोंबरे यांना राष्ट्रीय महागौरव पुरस्कार गोव्यात प्रदान
|