डॉ. माधवी जाधव ‘सारस्वत सम्माना’ने गौरवान्वित
कोल्हापूर, दि. 9 : महाराष्ट्र हिंदी परिषदेच्यावतीने हिंदी भाषा, साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यांबद्दल श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील हिंदीच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. माधवी शिवाजीराव जाधव यांना सारस्वत सम्मानाने गौरविण्यात आले. परिषदेचे 32वें अधिवेशन व दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र शनिवारी विवेकानंद कॉलेजमध्ये सुरू झाले. याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे माजी कुलगुरु डॉ. इरेश स्वामी यांच्या हस्ते डॉ. माधवी शिवाजीराव जाधव यांना पुरस्कार राशि, सम्मानपत्र, सम्मानचिह्न, शॉल, श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र हिंदी परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल काळे, मुख्य सचिव डॉ. गजानन चव्हाण, सोलापूर विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील माजी विभागप्रमुख प्रो. डॉ. चंद्रदेव कवडे, शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे माजी विभागप्रमुख व ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. वसंत मोरे, शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागाचे माजी प्रमुख डॉ. पी. एस. पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख डॉ. गजानन चव्हाण, आय.क्यु.ए.सी. समन्व्यक डॉ. श्रुती जोशी, डॉ.पंढरीनाथ पाटील, डॉ. देवीदास बामणे, डॉ. नाजिम शेख, डॉ.भाऊसाहेब नवले, डॉ सुरेश शेळके, डॉ विठृलसिंह ढाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यापूर्वी त्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक मार्गदर्शक पुरस्कार (अनंत करंडक) व "स्वामिनी" राज्यस्तरीय पुरस्कार (अविष्कार फौंउडेशन) प्राप्त झाला आहे. त्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका म्हणून ओळखल्या जातात.
डॉ. जाधव यांना पदवी-पदवीत्तोर अध्यापनाचा 36 वर्षांचा अनुभव असून त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या विभिन्न शैक्षणिक समित्यांवर काम केले आहे. राष्ट्रीय, अंतर्राष्ट्रीय पत्र-पत्रिकांमध्ये शोध निबंध प्रसिद्ध आहेत. राष्ट्रीय, अंतर्राष्ट्रीय चर्चासत्र, अधिवेशनात अध्यक्ष, विषय तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन केले आहे. संत साहित्य, तुकडोजी महाराज यांच्या त्या गाढे अभ्यासक आहेत. कोल्हापूर, सांगली आकाशवाणी केंद्रावर त्यांची भाषणे प्रसारित आहेत. 100 हून अधिक व्याख्याने दिली आहेत. अंतर्राष्ट्रीय काव्य मंच, महिला काव्य मंच (महाराष्ट्र)मध्ये सक्रिय सहभाग आहे. पाठ्यपुस्तकांसाठी संपादक व लेखक भूमिका पार पाडली आहे. विविध विषयांवर त्यांच्या कविता प्रकाशित आहेत. यूजीसीचा मेजर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केला आहे.