विशेष बातम्या
सारीका निर्मळ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा
By nisha patil - 7/11/2025 3:30:58 PM
Share This News:
सारीका निर्मळ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा
स्वखर्चातून 25 एलईडी स्ट्रीट लाईट्स बसवून लोकार्पण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे होणार वाटप..
हमीदवाडा (ता. करवीर) — ग्रामपंचायत हमीदवाडा सदस्या तसेच विद्या मंदिर शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ. सारीका रोहन निर्मळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचा सुंदर उपक्रम हाती घेतला आहे. “समाजासाठी उजेड आणि विद्यार्थ्यांसाठी ज्ञानप्रकाश” या भावनेतून त्यांनी स्वखर्चातून हमीदवाडा प्रभाग क्र. 2 (चावडी गल्ली, एरंड गल्ली, हुडा गल्ली) परिसरातील एकूण 25 एलईडी स्ट्रीट लाईट्स बसवून त्यांच्या लोकार्पणाचा उपक्रम राबविला आहे.
या सामाजिक कार्यासोबतच विद्या मंदिर, हमीदवाडा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून ज्ञानप्रकाशाचा दिवा प्रज्वलित करण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला आहे. हा कार्यक्रम १० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता विद्या मंदिर, हमीदवाडा येथे पार पडणार आहे.
या निमित्ताने सौ. सारीका निर्मळ यांनी आपला वाढदिवस समाजसेवेच्या आणि जनकल्याणाच्या कार्याशी जोडून साजरा करण्याचा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागात प्रकाश व शिक्षणाचा प्रसार करण्याच्या त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
गावातील नागरिक, पालक आणि विद्यार्थी यांना उपस्थित राहून या सामाजिक कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सारीका निर्मळ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा
|