विशेष बातम्या
सरिता सासने यांना "श्रम भूषण पुरस्कार" प्रदान
By nisha patil - 5/26/2025 4:49:51 PM
Share This News:
सरिता सासने यांना "श्रम भूषण पुरस्कार" प्रदान
सामाजिक कार्य, संघटन कौशल्य व सांस्कृतिक योगदानाची दखल
कोल्हापुरातील शिवाजीपेठ येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे यांना श्रम फाउंडेशनच्या वतीने "श्रम भूषण पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले. पद्मश्री मुरलीकांत पेटकर आणि सचिव शिवराज नायकवाडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान झाला. महिलांवरील अत्याचाराविरोधात लढा, सामाजिक प्रश्नांवरील आंदोलन, संस्कृती जपण्यासाठी कार्यक्रम, आणि सांस्कृतिक योगदान यांची दखल घेऊन सासणे यांचा सन्मान करण्यात आला.
सरिता सासने यांना "श्रम भूषण पुरस्कार" प्रदान
|