बातम्या
सरपंच राजू मगदूम यांची रुई येथे श्री गणरायाच्या आरतीत भक्तीमय उपस्थिती
By nisha patil - 4/9/2025 3:30:14 PM
Share This News:
सरपंच राजू मगदूम यांची रुई येथे श्री गणरायाच्या आरतीत भक्तीमय उपस्थिती
आनंद-बंधुभाव वृद्धिंगत व्हावा, श्री गणरायाचरणी सरपंच राजू मगदूम यांची प्रार्थना
गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा संगम मानला जातो. या मंगलमय वातावरणात माणगावचे विकासरत्न सरपंच राजू मगदूम (दादा) यांनी रुई येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळास भेट दिली. त्यांनी श्री गणरायाचे आशीर्वाद घेऊन आरती व महाप्रसादाचे उद्घाटन केले.
यावेळी सरपंच राजू मगदूम यांनी समाजात आनंद, बंधुभाव आणि परस्परांतील ऐक्य वृद्धिंगत व्हावे, अशी श्री गणराया चरणी प्रार्थना केली. कार्यक्रमास माजी आमदार राजीव आवळे, अभय काश्मीर, अमोल आवटे, ग्रामस्थ तसेच मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच राजू मगदूम यांची रुई येथे श्री गणरायाच्या आरतीत भक्तीमय उपस्थिती
|