बातम्या
चैत्र पौर्णिमा जोतिबा यात्रेनिमित्त सासनकाट्या दाखल....
By Administrator - 11/4/2025 4:15:14 PM
Share This News:
चैत्र पौर्णिमा जोतिबा यात्रेनिमित्त सासनकाट्या दाखल....
प्लास्टिक मुक्त यात्रेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
चैत्र पौर्णिमेनिमित्त जोतिबा यात्रा पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावात साजरी होत असून, राज्यभरातून हजारो भाविक या यात्रेसाठी जोतिबाच्या गडावर येत आहेत. यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाट्याही विविध भागांतून मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यंदाची जोतिबा यात्रा प्लास्टिकमुक्त व्हावी, यासाठी सर्व भाविक, व्यापारी आणि सेवाभावी संस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. यात्रेच्या दरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध ठिकाणी महाप्रसाद आणि पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही व्यवस्था करण्यात येत आहे. जोतिबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता आणि स्वच्छता याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. यात्रेच्या मार्गावर स्वच्छता मोहीम राबवली जात असून, भाविकांनी स्वच्छता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चैत्र पौर्णिमा जोतिबा यात्रेनिमित्त सासनकाट्या दाखल....
|