बातम्या
सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण — एसआयटीची मागणी, फोन डिलिटचा आरोप!
By nisha patil - 10/29/2025 4:49:54 PM
Share This News:
सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण — एसआयटीची मागणी, फोन डिलिटचा आरोप!
साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी केली आहे.
कुटुंबीयांचा गंभीर आरोप आहे की — महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर कोणीतरी तिचा फोन फिंगरप्रिंटने अनलॉक करून त्यातील महत्त्वपूर्ण माहिती डिलिट केली, तसेच तिचं व्हॉट्सअॅप अकाउंट मृत्यूनंतरही अॅक्टिव्ह दिसत होतं, असा संशय व्यक्त केला आहे.
नातेवाईकांनी सांगितलं की, “आम्ही फलटणमध्ये जबाब नोंदवणार नाही, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी आणि सीडीआर तपासला जावा.”
तसेच त्यांनी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेच्या आत्मसमर्पणावरही प्रश्न उपस्थित केले, “मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशीच त्याने आत्मसमर्पण कसं केलं? त्याने पुरावे नष्ट करूनच आत्मसमर्पण केलं असावं,” असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण — एसआयटीची मागणी, फोन डिलिटचा आरोप!
|