बातम्या

तपोवनमध्ये ५ ते ८ डिसेंबरला ‘सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन’...

Satej Agriculture and Livestock Exhibition


By nisha patil - 11/27/2025 3:28:51 PM
Share This News:



तपोवनमध्ये ५ ते ८ डिसेंबरला ‘सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन’...

देश–विदेशातील 200+ कंपन्या, 150+ पशुपक्षी; शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाचा महासंगम

 शेतकऱ्यांना एकाच छताखाली आधुनिक शेती तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण मशिनरी व पशुपालनाविषयी अद्ययावत माहिती मिळावी या हेतूने ५ ते ८ डिसेंबर २०२५ या काळात तपोवन मैदानावर ‘सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र आणि तपोवन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले असून ही माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली.

या भव्य प्रदर्शनात देश–विदेशातील 200 पेक्षा अधिक नामांकित कृषी कंपन्या, 150+ पशुपक्षी, जातिवंत जनावरे, आधुनिक कृषी यंत्रसामग्री, नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे, तसेच तांदूळ महोत्सव व धान्य महोत्सव असे विविध उपक्रम आयोजित केले आहेत.

उद्घाटन ५ डिसेंबर रोजी सायं. ४ वा.
उद्घाटन प्रसंगी माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर आणि माजी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित राहणार आहेत.

यावेळी संयोजक विनोद पाटील, सुनील काटकर, धीरज पाटील, जयवंत जगताप, जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगिरे, डॉ. सुनील कराड, उपसंचालक नामदेवराव परीट, डॉ. प्रमोद बाबर, युवराज पाटील, तसेच स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत उपस्थित होते.

संयोजकांनी शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.


तपोवनमध्ये ५ ते ८ डिसेंबरला ‘सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन’...
Total Views: 62