बातम्या

Satej Patil Raju Shetty s....सतेज पाटील, राजू शेट्टींचा खर्डा-भाकरीतून सरकारला इशारा..

Satej Patil Raju Shetty s


By Administrator - 4/7/2025 12:36:44 PM
Share This News:



सतेज पाटील, राजू शेट्टींचा खर्डा-भाकरीतून सरकारला इशारा..

शक्तीपीठ महामार्गाला सतेज पाटील-राजू शेट्टी शेतकऱ्यांसोबत आघाडीवर..

शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन पेटवत मांजरी गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातच सकाळी बैठक घेऊन न्याहारी उरकली. खर्डा आणि भाकरीचा आस्वाद घेत, "शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे!" अशा घोषणा देत या आंदोलनाला विशेष स्वरूप दिलं.

या शेतकरी बैठकीत काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, तसेच शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे हे उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत या नेत्यांनीही शेतातच सहभागी होत एकजूट दाखवली.

शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांची जमीन जाण्याची भीती आणि पर्याय न दिल्याचा आरोप करत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. राजकीय पक्ष, शेतकरी संघटना आणि स्थानिक नागरिक एकत्र येत या प्रकल्पाला विरोध करत आहेत.


Satej Patil Raju Shetty s...सतेज पाटील, राजू शेट्टींचा खर्डा-भाकरीतून सरकारला इशारा..
Total Views: 338