राजकीय

सागरमाळातील ‘रेड्याची टक्कर’ नव्या पिढीला इतिहास माहीत होण्यासाठीच हे शिल्प उभारले..: सतेज पाटील

Satej Patil criticizes the administration over the quality of roads during the sculpture unveiling


By nisha patil - 11/19/2025 1:24:04 PM
Share This News:



 सागरमाळ येथे माजी आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार जयश्री जाधव यांच्या निधीतून उभारलेल्या ‘रेड्याची टक्कर’ स्मृती शिल्पाचे अनावरण काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिल्पामुळे इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचेल तसेच आगामी निवडणुकांमधील उमेदवारांनाही हे शिल्प स्फूर्तीदायी ठरेल, असे सतेज पाटील यांनी सांगितले. शिल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदार तेजस माने यांनी “हे शिल्प नातू होईपर्यंत हलणार नाही” असा दावा केल्याचे सांगत, सतेज पाटील यांनी शहरातील रस्ते दुसऱ्याच दिवशी वाहून जातात असा चिमटा काढत प्रशासनाला टोला लगावला.

शाहूनगरातील शाहू महाराज पुतळा सुशोभीकरणासाठी २० लाख रुपये आणि शिल्पाभोवती सीसीटीव्ही व लाईटिंगसाठी ५ लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली.

माजी आमदार जयश्री जाधव यांनी हे शिल्प उभारणे हे दिवंगत चंद्रकांत जाधव यांचे स्वप्न असल्याचे सांगितले, तर ऋतुराज पाटील यांनी शाहू महाराजांचा इतिहास पुढील पिढीसाठी जतन करण्याचा उद्देश स्पष्ट केला.

कार्यक्रमाला राजू लाटकर, प्रतिज्ञा उत्तुरे, भूपाल शेटे, काकासाहेब पाटील, शिल्पकार ललित डोंगरसाने, माजी नगरसेवक विनायक फाळके, खंडू कांबळे, शिवाजी कवाळे, प्रवीण केसरकर, विजय सुर्यवंशी, दुर्गेश लिंग्रस, राजू साबळे, अनुप पाटील, सुरेश ठोणूक्षे, उमेश पवार, सर्जेराव साळोखे, समीर कुलकर्णी, स्वप्निल रजपूत, संदीप पाटील, रवींद्र नलवडे, विनायक सुर्यवंशी, शशिकांत पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


सागरमाळातील ‘रेड्याची टक्कर’ नव्या पिढीला इतिहास माहीत होण्यासाठीच हे शिल्प उभारले..: सतेज पाटील
Total Views: 60