बातम्या
सतेज पाटील यांना मोठी संधी मिळण्याची शक्यता...
By nisha patil - 7/16/2025 7:34:29 PM
Share This News:
सतेज पाटील यांना मोठी संधी मिळण्याची शक्यता...
नव्या नेतृत्वाबाबत सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर
महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ 29 ऑगस्टला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आता नव्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये कोल्हापूरचे सतेज (बंटी) पाटील हे आघाडीचे नाव मानले जात आहे.
राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे की विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आता काँग्रेसकडे दिली जाणार असून, त्यासाठी सतेज पाटील यांचं नाव अग्रस्थानी आहे. माजी राज्यमंत्री म्हणून त्यांचा अनुभव, दक्षिण महाराष्ट्रातील प्रभाव आणि समन्वयक भूमिकेमुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
सतेज पाटील यांना मोठी संधी मिळण्याची शक्यता...
|