बातम्या
विमा योजनेतील भ्रष्टाचारावर सतेज पाटील यांचा सवाल
By nisha patil - 1/7/2025 4:57:52 PM
Share This News:
विमा योजनेतील भ्रष्टाचारावर सतेज पाटील यांचा सवाल
दोषींवर महिन्याभरात कारवाई करणार – कृषी मंत्री कोकाटे यांचे आश्वासन
कोल्हापूर : शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या ‘एक रुपयात पीक विमा योजने’त कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत सरकारला जाब विचारला.
यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी संबंधित दोषींवर महिन्याभरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच पंचनाम्यानंतर ३० दिवसांत भरपाई देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोकाटे म्हणाले की, नवीन पीक योजनेमुळे सरकारचे ५५०० कोटी रुपये वाचले असून ते शेतकऱ्यांच्या भांडवली गुंतवणुकीसाठी वापरले जातील.
विमा योजनेतील भ्रष्टाचारावर सतेज पाटील यांचा सवाल
|