बातम्या
Satej Patil s ...टोलमाफी व चार्जिंग स्टेशन वाढीवर सतेज पाटील यांचा प्रश्न..
By Administrator - 4/7/2025 11:51:45 AM
Share This News:
टोलमाफी व चार्जिंग स्टेशन वाढीवर सतेज पाटील यांचा प्रश्न..
कोल्हापूर : राज्यात ई-वाहनांची संख्या वाढत असताना जिल्हानिहाय चार्जिंग स्टेशन आणि टोलमाफीच्या अंमलबजावणीबाबत सरकारने कोणती पावले उचलली आहेत, असा प्रश्न काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.
यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, महाराष्ट्र ई-वाहन धोरण 2025 अंतर्गत प्रत्येक २५ किमीवर चार्जिंग सुविधा निर्माण केली जाणार आहे. सध्या राज्यात ३७०० चार्जिंग पॉइंट्स कार्यरत आहेत. शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गावर पूर्ण टोलमाफी लागू केली असून इतर राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर ५०% सवलत लागू करण्यात आली आहे.
Satej Patil s...टोलमाफी व चार्जिंग स्टेशन वाढीवर सतेज पाटील यांचा प्रश्न..
|